अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवनी परिसरातील रेल्वे रुळावर एका २२ वर्षीय युवकाचा मृतदेह शरीरावर जखमा असलेल्या अवस्थेत आढळला. रेल्वेखाली आल्याने या युवकाचा मृत्यू झाला असून मृताची ओळख पटत नसल्याने ओळख पाठविण्याचे आवाहन खदान पोलिसांनी केले आहे.
या घटकाच्या अंगावर मेहंदी रंगाची टी-शर्ट तर लाल रंगाचे लोअर घातलेले आहे. उंची ५ फूट ५ इंच असून बांधा मजबूत आहे. या युवकांचे वय अंदाजे २० ते २२ वर्षे असून रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. या मृतदेहाची उत्तरीय तपासणी सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आली असून मृतदेह याच ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. खदान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय जमदाडे करीत आहे.