लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भस्तरीय युवा महोत्सवात शुक्रवारी विविध कलाकुसरींसह सहा एकांकिकेतून सामाजिक संदेश दिला. एकांकिकेच्या आशयाला प्रेषकांनी भरभरू न प्रतिसाद दिला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस विदर्भातील विविध कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ््या स्पर्धेत सहभाग घेतला. शुक्रवारी दिवसभर विविध कला प्रकार सादर झाले.
रंगमंच प्रकारात (थिएटर इव्हेंट) मध्ये एकूण सहा एकांकिका सादर करण्यात आल्या. यात कृषी महाविद्यालय अकोला, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला, वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय अमरावती, कृषी महाविद्यालय दारव्हा, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी आपले नैपुण्य सादर केले. स्कीट प्रकारात एकूण १५ महाविद्यालये सहभागी झाले तर माइममध्ये १५ व मिमिक्रीमध्ये ५ महाविद्यालये सहभागी झाले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधू जाधव, प्रा. दिलीप अलोणे (वणी), डॉ. अनिल कुलकर्णी उपस्थित होेते. सूत्रसंचालन डॉ. वीरेंद्र ठाकूर यांनी केले.