शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा युवक गजाआड

By admin | Published: May 23, 2014 10:45 PM

अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकास खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गजाआड केले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही. मुलीच्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकास खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गजाआड केले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही. मुलीच्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येईल. मलकापूर परिसरात राहणारा कैलास हिरामण सावळे (३२) या विवाहित युवकाने परिसरातीलच एका १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गुजरातमध्ये पळवून नेले. कैलास सावळे याने आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार अडीच महिन्यांपूर्वी तिच्या कुटुंबीयांनी खदान पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुजरातला पळवून नेल्यावर त्याने या ठिकाणी एमआयडीसीमध्ये काम करून तो भाड्याने खोली करून मुलीसोबत राहू लागला. दरम्यान, कैलास सावळे याने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तब्बल दोन-अडीच महिने अल्पवयीन मुलीचे शोषण केल्यानंतर तो मुलीला घेऊन अकोल्यात परत आला. ही माहिती खदान पोलिसांना मिळताच त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले आणि शुक्रवारी दुपारी त्याला गजाआड केले. आरोपी कैलास सावळे हा विवाहित असून, त्याला दोन लहान मुले आहेत. असे असतानाही त्याने पत्नी, दोन लहान मुलांना वार्‍यावर सोडले आणि अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. यासंदर्भात पीडित मुलीने खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुलीच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी तिला सवार्ेपचार रुग्णालयामध्ये पाठविले आहे. तिच्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खदान पोलिस आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहेत.