बाळापूर मतदार संघातील व्याळा गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांचे नेते स्वार्थ साधून घेण्यासाठी समाेर येतात. असे करताना जातीपातीच्या राजकारणाला नाहक बळ दिल्या जाते. यामुळे गावात एकाेप्याने राहणाऱ्या नागरिकांमध्ये दुफळी निर्माण हाेते. अशा राजकारणाला बाजूला सारत व्याळा येथील सुशिक्षित युवकांनी ग्रामपंचायतची निवडणूक अविराेध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथे वॉर्डनिहाय पॅनलमध्ये इच्छुक उमेदवारांचा भरणा असून, सरपंच पदाकरिता हाेणारा घाेडेबाजार यंदा बंद करण्याच्या उद्देशातून उच्च शिक्षित युवकांनी अविराेध निवडणुकीसाठी जनजागृती सुरू केली आहे. यासाठी गावांत ठिकठिकाणी कॉर्नर बैठका आयाेजित केल्या जात आहेत. मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी अविराेध निवडणूक झाल्यास विकास कामांसाठी भरीव निधी देण्याचे जाहीर केल्यामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
व्याळा ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करण्यासाठी युवकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:18 AM