अकोला : ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना भारतीय रेल्वेने प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. ही सवलत केवळ द्वितीय श्रेणी, स्लीपरच्या प्रवासासाठी लागू राहील. एका राज्यातून दुसºया राज्यात यात्रा करणाºया युवकांसाठी ही सवलत दिली जाणार असली तरी त्यात खालील अटी लागू करण्यात आल्या आहेत.ज्या युवकांचे एकूण मासिक उत्पन्न प्रति महिना ५ हजारांहून जास्त नाही, त्यांनाच सवलत घेता येईल. प्रवासाची सुरुवात किमान ३०० किलोमीटरपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. ही सुविधा एकतर्फी किंवा परतीच्या प्रवासासाठीही लागू राहील. ही सवलत केवळ मूळ प्रवासाच्या तिकिटासाठी लागू राहील. त्यात अतिरिक्त प्रभार, आरक्षण शुल्क, अन्य शुल्क लागू राहतील. ही सवलत सामान्य रेल्वेसाठीच राहील. ही सवलत विभिन्न राज्यांतील संबंधित विभागांचे सचिव यांच्याद्वारे प्रमाणित केलेल्या युवकांना दिली जाणार आहे.