शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

पेट्रोल पंपवर काम करणारा आशुतोष शिकवितो प्राचीन युद्धकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 3:58 PM

ध्येयवेडा तरुण आशुतोष विवेक चव्हाण स्वत: तर या कलेत पारंगत झालाच; पण आपल्यासारख्या अनेक युवकांना ही कला आत्मसात करण्यासाठी सदैव प्रेरित करीत असतो.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: भारतीय युद्धकला ही आत्मरक्षा, प्रतिस्पर्धीवर मात करणे, शरीर स्वास्थ्य, मानसिक व आध्यात्मिक विकासाकरिता अवगत केली जाते. पूर्वी प्रत्येक नागरिक युद्धकलेत पारंगत नसला तरी स्वरक्षणासाठी ही कला अवगत करीत असत. आज मात्र ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे; परंतु अकोल्यातील खडकी परिसरात राहणारा ध्येयवेडा तरुण आशुतोष विवेक चव्हाण स्वत: तर या कलेत पारंगत झालाच; पण आपल्यासारख्या अनेक युवकांना ही कला आत्मसात करण्यासाठी सदैव प्रेरित करीत असतो. आशुतोषने रात्रपाळीत पेट्रोल पंपवर काम करू नही आतापर्यंत जवळपास ५५० मुला-मुलींना युद्धकलेत पारंगत केले आहे.आशुतोषने पेट्रोल पंपवर काम करीत मुक्त विद्यापीठातून बारावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने कराटेमध्ये ब्लॅक बेल्टही प्राप्त केला आहे; परंतु लहानपणापासून शिवचरित्रातील प्रत्येक व्यक्तिमत्त्व आकर्षिक करीत असल्याने युद्धकला शिकण्याचे त्याला वेड लागले. या वेडापायी त्याने मुंबई गाठली. मुंबई येथे चार वर्षे नोकरी करीत दोन वर्षे ठाण्यातील छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अमित गडाकुश यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. युद्धकलेत आपल्या परिसरातील युवकांना प्रशिक्षित करावे, हाच विचार घेऊन अकोल्याला परतला. अकोल्यात शिव प्रतिष्ठान प्राचीन युद्धकला केंद्र सुरू करू न ८ ते २२ वर्षांतील मुले व मुलींना प्रशिक्षण देणे सुरू केले. आतापर्यंत जवळपास ५५० खेळाडूंना आशुतोषने युद्धकलेचे प्रशिक्षण दिले.रात्री पेट्रोल पंपवर नोकरी, सकाळी एका खासगी शाळेत नोकरी, सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देणे असा आशुतोषचा दिनक्रम. यासोबत पोलीस बॉइज असोसिएशनचे कार्य. शिव प्रतिष्ठानला जेवढाही प्रशिक्षणाचा किंवा शस्त्रांचा तो सर्व खर्च आशुतोष स्वत:च करतो. दोन्ही नोकरी करू न जेवढाही पैसा मिळतो, तेवढा शिवकालीन प्राचीन युद्धकलेच्या प्रचार व प्रसारासाठी करतो. लोकप्रतिनिधी किंवा दानशूर व्यक्ती यांच्याकडूनदेखील कधीच मदत घेतली नाही. शिव प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी मुलींना व महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. खेडे गावामध्ये जाऊन दोन महिन्यांचे नि:शुल्क प्रशिक्षण, दरवर्षी उन्हाळ्यात महापुरुषांचे स्मारकांची साफसफाई करणे, मलकापुरातील अनाथ आश्रमातील मुलींना दोन वर्षांपासून नि:शुल्क प्रशिक्षण, रक्तदान शिबिर, योग प्रशिक्षण शिबिर, मुलांकरिता नि:शुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, शहीद जवानांना आदरांजली कार्यक्रमांचे आयोजन आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आशुतोषने सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २४ पदकेगोवा येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बीच कॉम्बेट गेम्स २०१९ (समुद्रतटीय युद्ध) स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंनी आशुतोषच्या मार्गदर्शनात २४ पदके मिळविली. सातवी राज्यस्तरीय शिवकालीन दांडपट्टा स्पर्धा, तेरावी राष्ट्रीय आष्टेडू आखाडा स्पर्धेतही एकूण २७ पदके प्राप्त केली. जिल्हास्तरीय स्पर्धेत ६७ आणि विभागीय स्पर्धेत ५२ पदकांची कमाई केली.महिला व मुलींना मोफत प्रशिक्षणशिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला व मुलींना नेहमीकरिताच आशुतोषने मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. पुरुषांप्रमाणेच महिलादेखील स्वरक्षणासाठी सक्षम असावी, असे आशुतोषला वाटते. यासाठी लाठीकाठी, तलवारबाजी, भाला, दांडपट्ट्याचे प्रशिक्षण देण्यात येते.चित्तथरारक प्रात्यक्षिकशिवजयंती, संभाजी जयंतीनिमित्त शहरातून निघत असलेल्या शोभायात्रेत आशुतोष व त्याचे विद्यार्थी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करू न युद्धकलेचा प्रचार करतात. प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ तयार करू न समाजमाध्यमाद्वारे प्रसार करतात.युद्धकला प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी अनेक समस्यांना समोरे जावे लागते. आर्थिकदृष्ट्या फार खर्चिक आहे. ही कला टिकविण्यासाठी लोकप्रतिनिधी व दानशूर व्यक्तींना समोर येऊन मदत केली पाहिजे- आशुतोष चव्हाण, युद्धकला प्रशिक्षक 

 

टॅग्स :Akolaअकोला