बुलडाणा, दि. ८ : तालुक्यातील गिर्डा येथील ब्रिटीश कालीन भितींवरून सेल्फी घेण्याच्या नादात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. गिर्डा येथे जिल्ह्यातील एक पर्यटनस्थळ असून, येथे निसर्गरम्य वातावरणात अनेक पर्यटक जातात. नागपंचमी व रविवारच्या सुटीमुळे शहरातील ऋषीकेश शंकर डुकरे हा मित्रांसोबतच गिर्डा येथे गेला होता. तेथील ब्रिटीश कालीन काळ्या भिंतीवरून सेल्फी घेण्यासाठी तो चढला असता त्याचा पाय घसरून तो खाली पडला व त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सेल्फी घेताना पडून युवकाचा मृत्यू
By admin | Published: August 09, 2016 2:19 AM