शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक तापडिया यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक वृषभ तिवसकार, द्वितीय क्रमांक प्रशिश थेटे, तृतीय क्रमांक संजय झाकणे तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक कु.वैष्णवी रामकिसन आहेवार, द्वितीय क्रमांक दीपाली शालीग्राम भावे, तृतीय क्रमांक वैदेही उमेश ईखार यांनी पटकावला आहे. त्याचबरोबर प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत ५५ वर्षीय बंडूभाऊ चवरे यांनी १० किमीची स्पर्धा कमी वेळात पूर्ण केली. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोपाल ढोले होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार राजेश गुरव, डॉ अशोक तापडिया, राम घंगाळ, राम पाऊलझगडे, शांतिकुमार सावरकर, राजेन्द्र कोरडे, लोणकर, सुमेध गायगोळ, प्रा.सचिन थाटे, रामा फाटकर, कोपरे, वाघ, पप्पूसेठ सोनटक्के, चंद्रकांत मोरे, पंकज कांगटे, नेमाडे, सुईवाल, शंकर तायडे, शरद मानकर, प्रकाश सोनोने, सचिन राऊत, राजेंद्र निर्मळ, नितीन बोदडे, अजय बोदडे, नितीन ढोंगले, सुरेश तेलगोटे,उमेश गायगोळ, आयोजक आकाश आमटे व्यासपीठावर होते. विजेत्या स्पर्धकांना माजी सैनिक भाई प्रभाकरराव सावरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शांतिकुमार सावरकर यांच्याकडून स्मृती चषक देण्यात आले. प्रास्तविक प्रा. सचिन थाटे यांनी, संचालन प्रदीप राजुस्कर यांनी केले.
फोटो: