लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : कोरोना संकटाचा सामना करण्याकरिता लॉकडाउन करून संचारबंदी लागू केली आहे. अशा स्थितीत आवश्यक उपाययोजना न करणाºया बेजबाबदार नागरिकांना वेगवेगळ्या शिक्षा ‘आॅन दि स्पॉट’ दिल्या जात आहेत. मंगळवारी काही युवकांना तोंडावर मास्क न लावल्यामुळे नायब तहसीलदारांनी ५0 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.नायब तहसीलदार हरिश गुरव यांचे पथक व पोलीस वाहतूक शाखेच्या शिपायांनी अकोट शहरात चेहºयावर मास्क न लावता बिनधास्तपणे दुचाकीवरून फेरफटका मारणाºया काही युवकांनी सोनू चौकात पकडले. आधी कोरोनासंदर्भात असलेल्या उपाययोजनेबाबत जनजागृती करून दुर्लक्ष करणाºया काही युवकांना ५० उठाबशा काढायला लावल्या. दरम्यान, नागरिकांनी नाहक काम नसताना घराबाहेर पडू नये, असेही आवाहन प्रशासनाने केले. (तालुका प्रतिनिधी)
मास्क न लावणाऱ्या युवकांना उठाबशा काढण्याची शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:47 AM