अकोला: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने मे २०२४ मध्ये घेतलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीए फायनल व इंटरमीडिएट परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, सीए इंटरमीडिएट प्रथमच अकोल्याचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे. इंटरमीडिएट परीक्षेत अकोल्याचा युग सचिन कारिया याने संपूर्ण भारतात द्वितीय स्थान पटकावले आहे. यश शैलेंद्र पाटील याने देशातून ४५ वा क्रमांक तर यश मनोज देशमुख याने ४७ वा आणि पियुष प्रविणसिंग मोहता याने ४८ वा क्रमांक पटकावला आहे.
सीए फायनल आणि इंटरमिजिएटचे निकाल जाहीर झाले असून, सीए इंटरमिजिएट दोन्ही गटांचा निकाल १८.४२ टक्के आहे, तर सीए फायनलचा १९.८८ आहे. अकोल्याच्या इतिहासात प्रथमच सीए इंटरमिजिएट परीक्षेत चार विद्यार्थी मेरिट आले आहेत. यासोबतच ९० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीए इंटरमिजिएटचे दोन्ही गट उत्तीर्ण केले आहेत.
यामध्ये अचल दगडीया, आदित्य राऊत, अक्षय खंडेलवाल, आंचल अग्रवाल, अनिकेत कदम, अनुजा हलवणे, आस्था तिबडेवाल, अतुल पाहुजा, अवंतिका पाटील, भाविक अग्रवाल, भक्ती काचलिया, भावना तापडिया, धनश्री हेडा, दिव्यांका रुहाटीया, एशान मकसूद धरणी, गौरी बाहेती, गौरी जळकीते, हर्ष राठी, कार्तिक मापारी, कशिश अग्रवाल, खुशाल राठी, कृष्णा भट्टड, कृष्णा राठी, कुणाल यंबल, लखन गांगण, मधुर भारतीय, महेक नागवाणी, महिमा बालानी, माहिर गुरनानी, मानसी राठी, मो. तल्हा मो. झुबेर खान, मुस्कान जैस्वाल, नैन्सी झुनझुनवाला, नकुल चांडक, नयन चोपडे, निखिल मंत्री, निरव, सुमित निष्ठा केडिया, प्राची मुलतकर, प्रणव ठाकरे, प्रणव साबू, प्रणिता न्याती, प्रथमेश धर्मे, प्रेरणा भाटी, पूर्वा अग्रवाल, राघव सोनी, राज इसळ, रक्षा मुथा, राशी बोर्डे, रिद्धी गुप्ता, रितिका अग्रवाल, रौनक रुहाटीया, साहिल परवानी, साईराम बाहेती, संकल्प खंदारे, सार्थक जोशी, सौंदर्या झळके, सय्यम बाकलीवाल, श्रेयश दगडीया, सृष्टी झंवर, स्नेहा रेड्डी, सुचित जाजू, सुजल उकांडे, तनिष्क कोठारी, तनिष्क रांदड, तन्मय बन्सल, तरुण पर्वणी, तेजस मेहता, उन्नती शर्मा, वैष्णवी शर्मा, वैष्णवी भाले, यश भुतडा आदी घवघवीत यश प्राप्त केले आहे.