शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

फळबाग लागवड योजनेत शून्य लक्षांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:31 AM

Government Scheme : योजनेचे अनुदान रखडल्याने यावर्षी जिल्ह्याला लक्षांक देण्यात आला नाही.

अकोला : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने २०१८-१९ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली; परंतु मागील दोन वर्षांपासून सुरळीत सुरू असलेल्या या योजनेचे अनुदान रखडल्याने यावर्षी जिल्ह्याला लक्षांक देण्यात आला नाही, तर रखडलेले अनुदान चुकविण्यात येत असून, लक्षांक नसल्याने यंदा नवीन शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.

सन २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येतो. ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जाते. या योजनेत तीन वर्ष कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षी अनुक्रमे ५०, ३० व २० टक्‍के अनुदान देण्यात येते. प्रशासकीय कारवाई पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाते. पण, या वर्षात ही योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली नाही नसून यासाठी निधी देण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळणार नाही. मागील रखडलेले अनुदानच शासनाकडून देण्यात येत असल्याचे कृषी ‌विभागाकडून सांगण्यात आले.

 

२०१८-१९ मध्ये लक्षांक

२ कोटी

मंजूर अर्ज ३९६

२०१९-२० मध्ये लक्षांक

३ कोटी ११ लाख

मंजूर अर्ज

 

५५८

 

१६ फळपिकांना अनुदान

जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये ११३ हेक्टर, तर २०१९-२० मध्ये ४९६ हेक्टर क्षेत्रात फळ पिकांची योजनेतून लागवड करण्यात आली. यामध्ये १६ फळपिकांना अनुदान देण्यात आले.

८४ लाखांचे अनुदान रखडले!

फळपीक लागवड योजनेत २०२०-२१ मध्ये ७४ लाख रुपयांचे निधी प्राप्त झाला आहे. हा निधी अनुदान देय बाकी असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आला. ८४ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान अद्याप रखडले आहे.

 

तांत्रिक मंजुरीत अडकले अर्ज

मागील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. यामध्ये अनेक अर्जांना पूर्वसंमतीदेखील मिळाली; मात्र ९२७ अर्जांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. बहुतांश अर्ज तांत्रिक मंजुरी मिळू शकली नाही.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती