अकोला : जिल्हा परिषद शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांनी सोमवारी जिल्ह्यातील तीन गावांत जिल्हा परिषद शाळांना अकस्मात भेटी देऊन, तपासणी केली. त्यामध्ये एका गावातील शाळा सकाळी ८ वाजेपर्यंत उघडण्यात आली नाही, तर दुसºया गावातील शाळेला कुलूप आढळून आले.श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात येत आहेत. त्यानुषंगाने सोमवार, २० आॅगस्ट रोजी सकाळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांनी जिल्ह्यातील तीन गावांमधील जिल्हा परिषद शाळांना आकस्मिक भेट देऊन, तपासणी केली. त्यामध्ये अकोला तालुक्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा सकाळी ८ वाजेपर्यंत उघडण्यात आली नसल्याचे आढळून आले. तसेच बाभूळगाव येथील जिल्हा परिषद शाळेला सकाळी १०.४५ वाजता कुलूप असल्याचे आढळून आले, तर वाडेगाव येथील शाळेत एक शिक्षक गैरहजर असल्याचे आढळले.‘बीईओं’ना मागविणार स्पष्टीकरण!गोरेगाव येथील शाळा सकाळी ८ वाजेपर्यंत उघडण्यात आली नाही, बाभूळगाव येथील शाळा सकाळी १०.४५ वाजता कुलूपबंद आढळली, तर वाडेगाव येथील शाळेत एक शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे यासंदर्भात शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांच्याकडून संबंधित गट शिक्षणाधिकाºयांना (बीईओ) स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.