अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवार, २३ डिसेंबरपर्यंत) जिल्ह्यात १ हजार २६१ उमेदवारांचे १ हजार ३३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी ५४० उमेदवारांनी ५४२ अर्ज दाखल केले असून, सात पंचायत पंचायत समित्यांसाठी ७२१ उमेदवारांनी ७४८ अर्ज दाखल केले. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवार, २४ डिसेंबर रोजी होणार आहे.अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, २३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १ हजार २६१ उमेदवारांनी १हजार ३३० उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी ५४० उमेदवारांनी ५८२ अर्ज दाखल केले असून, सात पंचायत समित्यांसाठी ७२१ उमेदवारांनी ७४८ उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे.जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसाठी असे दाखल झाले उमेदवारी अर्ज!तालुका गट उमेदवार अर्जअकोला १० ११० ११५अकोट ०८ १०० १०७तेल्हारा ०८ ७५ ७९बाळापूर ०७ ७२ ८१बार्शीटाकळी ०७ ६९ ७५पातूर ०७ ५८ ६२मूर्तिजापूर ०७ ५६ ६३........................................................................एकूण ५३ ५४० ५८२सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी दाखल उमेदवारी अर्ज!पंचायत समिती गण उमेदवार अर्जअकोला २० १२६ १२७अकोट १६ ११४ ११९तेल्हारा १६ १०८ १०८बाळापूर १४ ९९ १०३बार्शीटाकळी १४ १०४ १०७पातूर १२ ७५ ८३मूर्तिजापूर १४ ९५ १०१.............................................................................एकूण १०६ ७२१ ७४८