शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक : ‘भारिप’च्या नाराजांनी तयार केले पॅनल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:05 AM

नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या १३ पेक्षा जास्त गटांमध्ये आणि पंचायत समित्यांच्या काही गणांमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना भारिप बहुजन महासंघाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पार्सल उमेदवारांविरोधात भारिप-बमसंच्या नाराज अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांमध्ये ‘पॅनल’ तयार केले असून, पार्सल उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समत्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३ पेक्षा जास्त गटांमध्ये आणि संबंधित गटांच्या पंचायत समित्यांच्या गणांमध्ये गट व गणाच्या कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत, पार्सल उमेदवारांविरुद्ध जिल्हा परिषदेच्या संबंधित गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी मिळाली नसल्याने, ‘भारिप’च्या नाराज अपक्ष उमेदवारांनी जिल्हा परिषद गटातील एक उमेदवार आणि त्या गटांतर्गत पंचायत समितीच्या दोन गणांतील दोन उमेदवार अशा तीन-तीन अपक्ष उमेदवारांचे ‘पॅनल’ तयार करण्यात आले आहे. पक्षाच्या नाराज उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत गट आणि गणांचे ‘पॅनल’ तयार केल्याने भारिप-बमसंच्या पार्सल उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केले आहे.अपक्ष एकाच ‘बॅनर’वर लढणार निवडणूक?कार्यक्षेत्राबाहेरील उमेदवारांना उमेदवारी देण्यात आल्याने, नाराज झालेल्या भारिप-बमसंच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांनी एकत्र येत पॅनल तयार केले आहे.संबंधित जिल्हा परिषद गटातील एक उमेदवार आणि पंचायत समितीच्या दोन गणांतील दोन उमेदवार असे तीन अपक्ष उमेदवार एकाच ‘बॅनर’वर निवडणूक लढणार असून, त्यादृष्टीने अपक्ष उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ