अकोला: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता गुरुवार,४ मार्च रोजी आयोजित जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ‘ऑनलाईन’ घेण्यात येणार आहे. एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन सुरू असताना जिल्हा परिषदेलाच मात्र ऑनलाईनच बंधन का असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे दरम्यान सभेत ३३ ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राव्दारे दिलेल्या सूचनेनुसार कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आहे सभेच्या विषय पत्रिकेवर ३३ विषयांचा समावेश करण्यात आहे. यापूर्वी पार पडलेल्या सभेचे कामकाज पाहिल्यास सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली हाेती. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागले आहे