जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सर्वसाधारण सभेची नोटीसही काढण्यात आली आहे. परंतू जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राव्दारे दिलेल्या सूचनेनुसार कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आॅनलाइन पध्दतीने घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेची ४ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभा आॅनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्ष व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सभा सचिवांच्या स्वाक्षरीचे पत्र २६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार ‘आॅनलाइन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:25 AM