शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

जिल्हा परिषद ते पंचायत समिती रस्त्याचे काम मंदावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 1:45 PM

अकोला: शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या जिल्हा परिषद ते पंचायत समिती रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून मंदावले आहे.

अकोला: शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या जिल्हा परिषद ते पंचायत समिती रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून मंदावले आहे. रस्त्याच्या एका बाजूला बोटावर मोजता येणाऱ्या अतिक्रमकांच्या मालमत्ता कायम आहेत. याप्रकरणी महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वय नसल्यामुळे रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरात सर्वत्र प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे मोठ्या धडाक्यात सुरू आहेत. आज रोजी नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौक, सिटी कोतवाली ते शिवाजी महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद ते पंचायत समिती आदी प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. या तीनही रस्त्यांसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मिळविला. या प्रमुख रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. यादरम्यान, शहरातील सर्व प्रमुख शासकीय-निमशासकीय कार्यालये, स्वायत्त संस्थांची वर्दळ असणाºया पंचायत समिती ते जिल्हा परिषदेपर्यंतच्या मुख्य रस्त्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी दोन वर्षांपूर्वी शासनाकडून एक कोटींचा निधी मिळविला होता. त्यातून रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदून त्या रुंद करण्यासाठी ३० लाख रुपये खर्च झाला. त्यानंतर सिमेंट रस्त्यासाठी आणखी दोन कोटी मंजूर झाले. अर्थात २ कोटी ७० लाख रुपये निधीतून जिल्हा परिषद ते पंचायत समितीपर्यंत १५ मीटर रुंद प्रशस्त रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून या रस्त्याचे काम मंदावल्याचे चित्र समोर आले आहे....तरीही दर्जा नाहीच!महापालिकेच्या बांधकाम विभागात अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी पदांवर काम करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नाही. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुलनेत महापालिकेच्या बांधकाम विभागाची यंत्रणा दर्जेदार सिमेंट रस्ते तयार करू शकत नसल्याचा गैरसमज असल्यामुळे की काय, शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आल्याचे दिसून येते. मध्यंतरी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी उघड केलेल्या सोशल आॅडिटच्या अहवालात सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या सिमेंट रस्त्यांचे पितळ उघडे पडले असून, सद्यस्थितीत निर्माणाधीन रस्त्यांचा दर्जाही अतिशय निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका