अकोला: जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित जागांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांकडून २० आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली असून, जिल्हा परिषदेचे १२ गट अनुसूचित जातीसाठी आणि ५ गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. तर सात पंचायत समित्यांचे २५ गण अनुसूचित जाती व ९ गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत.जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षित जागांसह प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसह सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या प्रभाग रचनेसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्या. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे १२ गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तर ५ गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. तसेच सात पंचायत समित्यांचे २५ गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आणि ९ गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले.जिल्हा परिषदेचे असे आहेत ५३ गट!अकोला तालुका: आगर, दहिहंडा, घुसर, उगवा, बाभुळगाव, कुरणखेड, कानशिवणी, बोरगावमंजू, चांदूर, चिखलगाव.अकोट तालुका: उमरा, अकोलखेड, अकोली जहागीर, आसेगाव बाजार, मुंंडगाव, वरुर, कुटासा, चोहोट्टा बाजार.बाळापूर तालुका: अंदुरा, हातरुण, निमकर्दा, व्याळा, पारस, देगाव, वाडेगाव.बार्शीटाकळी तालुका: कान्हेरी सरप, दगडपारवा, पिंजर, जनुना, महान, राजंदा, जामवसू.पातूर तालुका: शिर्ला, चोंढी, विवरा, सस्ती, पिंपळखुटा, आलेगाव.तेल्हारा तालुका: दानापूर, हिवरखेड, अडगाव बु., तळेगाव बु., बेलखेड, पाथर्डी, दहिगाव, भांबेरी.मूर्तिजापूर तालुका: लाखपुरी, बपोरी, कुरूम, माना, सिरसो, हातगाव, कानडी.