अकाेला : अकोल्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि बेड व रेमडेसिविरसाठी होणारी रुग्णांची परवड लक्षात घेता, अकाेला जिल्हा परिषदेने काेविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून गुरुवारी त्याचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वतीने संचालित असलेले राज्यातील हे पहिलेच काेविड सेंटर असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काेविड सेंटरसाठी पुढाकार घेऊन अवघ्या तीन दिवसांत हे काेविड सेंटर सुरू केले आहे. त्यांच्याच हस्ते या काेविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, पोलीस उपविभागीय अधिकारी कदम, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे,
जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सवित्रीताई राठोड, सभापती आकाश शिरसाट, सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा परिषद सदस्य अविनाश खंडारे, राम गव्हाणकर, समिती सदस्य दिनकरराव खांडारे, डॉ. उन्हाळे, पांडे गुरुजी, मनोहर पंजवणी, रुग्ण कल्याण समिती सदस्य पराग गवई तसेच जिल्हा प्रशासनातील व जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.