शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

जिल्हा परिषद उपाध्यक्षांना बांधकाम, शिक्षण सभापतींना आरोग्य खाते मिळणार!

By संतोष येलकर | Published: November 30, 2023 6:16 PM

अकोला : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनील फाटकर यांना बांधकाम आणि शिक्षण, सभापती माया नाईक यांना आरोग्य ...

अकोला : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनील फाटकर यांना बांधकाम आणि शिक्षण, सभापती माया नाईक यांना आरोग्य खाते मिळणार आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी आयोजित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित दोन समित्यांच्या सभापतीपदांचा प्रभार उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापतींकडे सोपविण्यात येणार आहे.

गतवर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींचे खातेवाटप करण्यात आले होते. त्यामध्ये उपाध्यक्ष सुनील फाटकर यांच्याकडे अर्थ, सभापती आम्रपाली खंडारे यांच्याकडे समाजकल्याण, सभापती रिजवाना परवीन यांच्याकडे महिला व बालकल्याण आणि सभापती योगिता रोकडे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदाचा प्रभार देण्यात आला.

शिक्षण व आरोग्य या दोन खात्यांच्या सभापतीपदांचा अतिरिक्त प्रभार जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्याकडे राखून ठेवण्यात आला होता. अध्यक्षांकडील हा अतिरिक्त प्रभार आता उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापतींकडे देण्याचे सत्तापक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे.त्यामध्ये उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनील फाटकर यांना बांधकाम आणि शिक्षण सभापती माया नाईक यांना आरोग्य खाते देण्यात येणार असून, संबंधित दोन समित्यांच्या सभापतीपदांचा प्रभार येत्या १९ डिसेंबर रोजी आयोजित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.वर्षभरापासून अध्यक्षांकडे दोन समित्यांचा अतिरिक्त प्रभार!

वर्षभरापासून जिल्हा परिषद अध्यक्षांकडे असलेल्या शिक्षण व आरोग्य या दोन समित्यांच्या सभापतीपदांचा अतिरिक्त प्रभार उपाध्यक्ष व शिक्षण सभापतींकडे सोपविण्याची तयारी जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाकडून सुरू करण्यात आली.माझ्याकडे असलेल्या अतिरिक्त दोन खात्यांपैकी बांधकाम समितीचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे आणि आरोग्य समितीचा प्रभार शिक्षण सभापतींकडे सोपविण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मी दिले आहे. तसेच १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत हा विषय घेण्यात आला आहे.संगीता अढाऊअध्यक्ष, जिल्हा परिषद

टॅग्स :Akolaअकोला