.............
पावसाची हजेरी; पिकांना संजीवनी !
अकोला : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून अधून-मधून पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. तसेच पावसाअभावी रखडलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या मार्गी लागल्या आहेत.
............
शिवारात वन्यप्राण्यांचा धुडगूस
आगर : परिसरातील शिवारात वन्यप्राणी धुमाकूळ घालून पिकांची नासाडी करीत आहेत. या वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात रात्री जागरण करावी लागत आहे.
..................
माउलींच्या दर्शनाची भक्तांना आस....
अकोला येथील प्राचीन विठ्ठल मंदिरामध्ये आषाढीच्या निमित्ताने पारंपरिक पूजा करण्यात आली. आमदार गाेवर्धन शर्मा यांच्या हस्ते पहाटेच महापूजा झाली. काेराेना निर्बंधामुळे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंदच हाेते. आषाढीच्या निमित्ताने काशी येथील सुप्रसिद्ध महंत शंकरानंद सरस्वती महाराज दत्तात्रय मठ नारद घाट यांचे राजराजेश्वरनगरीमध्ये आगम न झाले हाेते. त्यांचे मंदिर समिती तसेच श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष विलास अनासने मनीषा अनासाने, कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा, आरती शर्मा, गिरीश जोशी, नितीन जोशी यांनी स्वागत केले.