मूर्तिजापूर: तालुक्यातील सिरसो येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच जयकुमार तायडे, उपसरपंच दाभाडे, डाहाके, प्रवीणकुमार वानखडे, खंडारे, खरतडकर, पोर्णिमा खंडारे आदी ग्रामपंचायत सिरसो सदस्य उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप बेलोकार, उपाध्यक्ष जया भुस्कट, शुभांगी मेहरे, विजय वानखडे, बाबुलाल औंधकर, निलेश मेहरे, मोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. जि. प. शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, संत गाडगेबाबा ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळा प्रशासनाच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापकांनी प्रास्ताविक करून आयोजनाबाबत, शालेय विकासासाठी आवश्यक गोष्टी, कोरोना काळात विद्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते गणवेश वाटप व शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित यांनी केले, तर देशमुख यांनी आभार मानले. (फोटो)
----------------------------------------
पणज येथे १४१ जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
पणज: अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. दि. ३१ मार्च व १ एप्रिल २०२१ रोजी कोविड लसीकरण करण्यात आले. यामध्ये गावातील ६४ महिला व ७७ पुरुष अशा एकूण १४१ जणांनी कोरोना लस घेतली.
गावातील वयोवृद्ध, ४५ वर्षांवरील दुर्धर आजारी असणाऱ्या महिला व पुरुषांनी कोविड लसीकरणासाठी नोंदणी करून लस घेतली. आरोग्य उपकेंद्रात सकाळी १० ते ४ वाजतापर्यंत लसीकरण सुरू होते. लसीकरणासाठी महिला आणी पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पणज बोचराचे ग्रामविकास अधिकारी एन.एन. दामदर, सरपंच मधुकरराव कोल्ले, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप ठाकूर, मधुकरराव आकोटकर, मुकुंदराव आकोटकर यांच्यासह १४१ महिला व पुरुषांनी कोरोनाची लस घेतली. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असून, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या आदेशानुसार अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे कोरोना लसीकरण शिबीर संपन्न झाले. शिबिरात आरोग्य सहाय्यक व्ही. पी. लाड, आरोग्य सेवक ए. एन. टेकाडे, डॉ. कैसर बेग, राणी लबडे, दिनेश बोचे, पत्रकार संजय गवळी, पत्रकार ओम शेंडे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ज्योती सोळंके, गटप्रवर्तक वर्षा पुनकर, आशा सेविका सिंधुताई राठोड, योगीता कोल्हे, ज्योती भगत, सरीता डायलकर, पंचफुलाबाई कोल्हे आणी आरोग्य विभागाचे अधिकारी व आशा स्वयंसेविका ग्रुप आदींनी परिश्रम घेतले.
--------------------------------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना लस घेऊन वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यात सहकार्य करावे.
मधुकरराव कोल्ले, सरपंच, पणज.