अकोला-गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे बहुतांश ग्रामपंचायतीने इलेक्ट्रिक देयक भरले नाहीत.त्यामुळे महावितरण कडून विद्युत जोडणी तोडण्याचा सपाटा सुरू आहे.मात्र यामुळे नवनिर्वाचित सरपंचापुढे मोठे आव्हान तयार झाले असून जिल्हा परिषदेने यावर सात दिवसाच्या आता उपाय काढावा अशी मागणी सरपंच संघटनेकडून होत आहे.
जिल्ह्यात २२४ ग्रामपंचायतीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत.त्यामुळे आधीच्या ग्रामपंचायत व्यवस्थापनाने इलेक्ट्रिक बिल का भरले नाही असा प्रश्न नवीन सरपंचाकडून विचारण्यात येत आहेत.त्यामुळे याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेवून सात दिवसांच्या आत सदर बिलाची रक्कम भरावी अन्यथा सरपंच संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
------------
कोट
ग्रामपंचायत पथंदिव्यांचे इलेक्ट्रिक बिल न भरल्याने ग्रामीण भाग अंधारात आहे.याबाबत जिल्हा परिषदेने लक्ष घालावे अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
वैभव माहोरे
सरपंच चांदुर,ता.जि अकोला