संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.अप्पर वर्धा धरणात सद्यस्थितीत ८५ दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. अप्पर वर्धा धरणातूनच अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दश लक्ष घन मीटरची मागणी आहे.सद्यस्थिती उन्हापा पारा वाढल्याने बाष्पीभवन गतीने होत आहे. प्रतिदिन ०.५५ दलघमी म्हणजे त्याची टँकरमध्ये तुलना केली, तर ५५ हजार टँकर एवढे पाण्याचे रोज बाष्पीभवन होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. धरणाच्या पाण्याच्या पातळीत रोज घट होत असल्याने व आणखी महिनाभर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागत असल्याने शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात ३१ जुलैपर्यंत ४५ दलघमी एवढा जिवंत साठा असायला हवा. सद्यस्थित धरणात ११४ दलघमी मृतसाठा शिल्लक आहे. गरज भासल्यास त्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करण्यात येतो. पण धरणात सध्यातरी तशी परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणात उन्हाळा पार पाडण्याइतका पाणीसाठा शिल्लक असला, तरी नागरिकांनी योग्यरित्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जलतज्ज्ञांनी नागरिकांना केले आहे.तीन नद्यांमधून येते धरणात पाणीमध्यप्रदेशमध्ये पाणी पडले तरच अप्पर वर्धा धरणात पाणी येते. वर्धा नदी, माडू नदी, व जाम नदीतून अप्पर वर्धा धरणात पाणी येण्याचे स्त्रोत आहेत. या तीनही नद्यांचा उगम मध्यप्रदेशातून असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामुळे मध्यप्रदेशात अपेक्षित पाऊस झाला तरच धरण भरते. विशेष: परतीचा जो पाऊस असतो तो पुरामुळे धरणात पाणी साठण्यासाठी मदतीचा ठरतो.दहा वर्षांनी धरण शंभर टक्के भरले नाही?गेल्या २० वर्षांत तीनदा अप्पर वर्धा धरण शंभर टक्के भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. १९९८,२००८ व २०१८ या वर्षांत धरण शंभर टक्के भरले नाही. मागील वर्षी धरण ५२ टक्केच भरले होते. धरणाच्या लाभक्षेत्रात ८५० मीमी पावसाची गरज होती. पण इतका पाऊस पडला नाही.अप्पर वर्धा धरणात ८५ दलघमी पाणीसाठा आहे. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दलघमी पाण्याची मागणी आहे. उन्हाचा पार वाढल्यान धरणातून रोज ०.५५ दलघमी बाष्पीभवन होत आहे.- प्रमोद पोटफोडे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग अमरावती
अप्पर वर्धातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:16 PM
अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.
ठळक मुद्देनियोजनाची गरज : धरणात ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक, उन्हाळा निभणार!