शहरं
Join us  
Trending Stories
1
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
2
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
5
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
6
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
7
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
8
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
9
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
10
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
11
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
12
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
13
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
14
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
15
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
16
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
17
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
19
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
20
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार

पथ्रोटजवळ अपघातात १ ठार, २७ जखमी

By admin | Published: September 10, 2015 12:06 AM

दर्यापूर येथून मूग तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणारे पीकअप वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली.

दुचाकीवरील महिला दगावली : वाहनही उलटले, सर्व जखमी इर्विनमध्ये दाखलपथ्रोट/अचलपूर : दर्यापूर येथून मूग तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणारे पीकअप वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली. त्यानंतर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून २७ मजूर गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पथ्रोटनजीकच्या पाचआंबा शिवाराजवळ घडली. अपघातातील जखमींना इर्वीनमध्ये दाखल केले आहे.वाहनचालक पसारपथ्रोट/अचलपूर : अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटना घडताच वाहनाचा चालक घटनास्थळाहून पळाला.अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव सुप्रिया संघपाल गावंडे (३२ रा. अंजनगाव) असे आहे. एम.एच. २७ के. ६११८पीकअप वाहन मजूर घेऊन वेगाने पाटाखेडा गावाकडे जात असताना या वाहनाची एम.एच. २७- ७३९७ या दुचाकीला धडक दिली. यात सुप्रिया संघपाल गावंडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोबत दुचाकी चालक रोहन पुंजालाल तेलमोरे (२९) हा सुध्दा गंभीर जखमी झाला. सदर पिकअप वाहन दुचाकीला धडक दिल्यानंतर उलटल्याने यात पिकअपव्हॅनमधील २७ मजुर जखमी झाले. जखमींमध्ये संध्या तुकाराम कास्देकर (२१), बालाजी भुसुमकर (४२), अजय पिलारी भुसुमकर (५०), सुधीया पुरखा भुसुमकर (२१), ममता शोभा बारस्कर (१९), चरखु पुरखा भुसुमकर (१९), समय रामचंद्र भुसुमकर (१५), रेखा रामचंद्र भुसूमकर (१५), टिंकी तुकाराम कास्देकर (१२), भुलाई छोटेलाल मावस्कर (२१) राजा छोटेलाल भुसूमकर (५), राहूल सिताराम भुसुमकर (१०), बुता पुरखा भुसुमकर आदींचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अमरावती येथे रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. (वार्ताहर)