शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अमरावती विभागात कर्जमाफी, प्रोत्साहन योजनेसाठी १० लाख शेतकरी पात्र; 7 लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 4:56 PM

शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे.

ठळक मुद्देशासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

अमरावती, दि.5 - शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. यासाठीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये चार लाख ७२ हजार ४१५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र, १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

शासनाद्वारे जाहीर कर्जमाफी योजनेसाठी अमरावती विभागातील सात लाख ९७ हजार ५६३ थकबाकीदार  व चालू दोन लाख असे एकूण १० लाख  शेतकरी पात्र आहेत. शासनाद्वारे जाहीर अटी व शर्तींनुसार किमान दोन लाख शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळू शकतो. यासाठी जिल्ह्यात २४ जुलैपासून सेतू, महाऑनलाईन, सीएससी व संग्राम केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, योजनेच्या सुरूवातीपासूनच जवळपास महिनाभर सर्व्हर डाऊनची समस्या, आधार सुविधा नसलेल्या शेतक-यांसाठी असणारे बायोमेट्रिक डिव्हाईस कनेक्ट न होने, नेट कनेक्टीव्हीटी नसणे, केंद्रचालकांचे शेतकऱ्यांना असहकार्य आदी कारणांमुळे कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा बोजवारा उडाला.

विहित कालावधीत घट होत असल्याने शेतकऱ्यांची ई-सेवा केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने दिवसभरात अत्यल्प अर्ज भरले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. परिणामी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी केंद्रांना भेटी देवून 'आपले सरकार’ यापोर्टल संदर्भात सीएमओ कार्यालयासी थेट संपर्क साधल्याने दोन दिवसांपासून सर्व्हरचा वेग वाढला आहे. सुटीच्या दिवशीदेखील केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रचालकांना दिल्यामुळे सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५  अर्ज अपलोड करण्यात आले आहेत.

अर्ज प्रक्रियेत यवतमाळ जिल्हा आघाडीवरविभागात २४ जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली. ३ तारखेपर्यंत 6 लाख 64 हजार,466 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्याच्या तुलनेत ४ लाख ७२ हजार ४१५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1 लाख ५१ हजार 846 अर्ज यवतमाळ, ९५,७४० अमरावती, ५६,१२५ बुलडाणा, ९२,३६७ वाशिम व ७६,७४० अर्ज अकोला जिल्ह्यात भरले गेले आहेत. रविवारपर्यंत राज्यात ५९,५७,९९१ शेतकºयांनी नोंदणी केली तर ४९,२३,८६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

४.७२ लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन अर्जविभागात सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्येही यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. येथील १,५१,८४६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. अमरावती ९५,३३७, अकोला ७६,७४०, बुलडाणा ५६,१२५ तसेच वाशिम जिल्ह्यात  ९२,३४७ अर्ज ३ सप्टेबरपर्यंत भरण्यात आले आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी