लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये नऊ व कंवरनगरात एक असे दहा व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. यामध्ये तीन व्यक्ती कोविड रुग्णालयात मृत पावले. यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. येथील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५३ वर पोहोचली आहे. यामध्ये १० मृत, चार कोरोनामुक्त, तर ३९ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.कंवरनगरात २९ एप्रिल रोजी ५८ वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. तसेच छायानगरात व शिराळा येथील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व व्यक्तींचे येथील कोविड रुग्णालयात निदन झाले होते. ताजनगरातील तीन पुरुष एक महिला व एक ७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या परिवारातील एका व्यक्तीचे २३ एप्रिल रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. यात त्या मृताचा मुलगा, सून नातू व मुलीच्या मुलासह गौसनगरातील २३ वर्षीय युवक व तारखेडा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा रेड झोनमध्ये असल्याचे गृहीत धरून उपाययोजना सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिली.
अमरावतीत आणखी १० पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या ५३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 6:34 PM
येथील क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये नऊ व कंवरनगरात एक असे दहा व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. यामध्ये तीन व्यक्ती कोविड रुग्णालयात मृत पावले. यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. येथील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५३ वर पोहोचली आहे.
ठळक मुद्दे१० मृत, चार कोरोनामुक्त, ३९ व्यक्तींवर उपचार