अमरावती : लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश असताना जे ॲन्ड डी मॉलमधील प्रियंका बेंगल्स, छाया बेंगल्स, लेडी वॉक, कल्पना स्टोर्स, मेड फॉर हर, महेंद्र स्टोर्स, नॅशनल सँडल हाऊस व बसडेपो जवळील मामाजी रेस्टॉरंट, बेस्ट हार्डवेअर, राज हार्डवेअर, इलेक्ट्रिकल दुकान सुरू असल्याने मनपाच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली तसेच दंड ठोठावून सील करण्यात आले.
या आस्थापना सील करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या उपस्थितीत बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक आनंद काशीकर, सर्वश्री शुभम चोमडे, राहुल वैद्य, मनोज इटनकर, सागर कठोर, अमर सिरवानी, मो. मुतिब यांच्या पथकामार्फत करण्यात आली. महापालिकेच्या बाजार परवाना विभागामार्फत सातत्याने संचारबंदीच्या काळात सातत्याने ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती या विभागाचे अधीक्षक उदय चव्हाण यांनी दिली.