अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर रोजी भीम अनुयायी मोठ्या संख्येने दादर, मुंबईकडे येतात. या दरम्यान होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता बडनेरा मार्गे होत १० अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत या गाड्या धावणार आहे.
यात ३ विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष मुंबई/ दादर ते सेवाग्राम/ अजनी/ नागपूर आणि १ विशेष अजनी ते मुंबई चालविण्यात येईल. या गाड्यांना नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि मुंबई रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आले आहे. यात १६ अथवा १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहे.
अशा धावतील विशेष गाड्या -- ट्रेन क्र. ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.- ट्रेन क्र. ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी ८ वाजता सुटेल आणि मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.- गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी १५.५० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.- ट्रेन क्र. ०१२४९ मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ९.३० पोहोचेल.- ट्रेन क्र. ०१२५१ ही ६ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.- ट्रेन क्र. ०१२५३ ही ७ डिसेंबर रोजी दादर येथून १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.- ट्रेन क्र. ०१२५५ ही ७ डिसेंबर रोजी १२.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.०० वाजता पोहोचेल.- गाडी क्र. ०१२५७ ही ८ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.- ट्रेन क्र. ०१२५९ ही ८ डिसेंबर रोजी दादर येथून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल- सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्र. ०२०४० अजनी येथून ७ डिसेंबर रोजी १३.३० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल.