अमरावती : शहर वाहतूक शाखेच्या ताफ्यात १०० बॉडीवोर्न कॅमेरे दाखल झाले आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना ते देणार येणार आहेत. वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांचे वाद नेहमीचेच. अनेक जण पोलिसांशी हुज्जत घालतात. अनेकांची त्यांच्या कॉलरपर्यंत मजल जाते. अशा साऱ्या विघ्नसंतोषींचा ‘कारनामा’ या बॉडीवोर्न कॅमेऱ्यात बंदिस्त होणार आहे. रेकॉर्डिंग करताना यात व्हायब्रेशन सिग्नलदेखील आहे.
स्पॉट इव्हिडंससाठी उपयुक्त असलेल्या या कॅमेऱ्यात ऑडिओ व व्हिडीओ रेकार्डिंगची सुविधा आहे. खास पोलीस खात्यासाठी हा कॅमेरा डिझाईन करण्यात आला आहे. हा कॅमेरा सीसीटीव्हीसारखा काम करणार असून तो मूव्हेबल आहे. चेक पॉइंट व वाहतूक नियंत्रणासाठी तो वापरला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी पुढाकार घेतला. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अनिल कुरळकर व वाहतूक पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वातील वाहतूक पोलीस ते बॉडीवोर्न कॅमेरे हाताळणार आहेत.
//////////
असा आहे बॉडीवोर्न कॅमेरा
बॉडीवोर्न कॅमेरा वाहतूक पोलिसांच्या वर्दीवर लावला जातो. तो खिशाला किंवा खाकीच्या शोल्डरच्या बाजूने अडकविला जातो. केवळ ८५ ग्रॅम वजन असलेल्या या कॅमेऱ्यात जीपीएस लोकेशन घेता येते. तो डस्ट व वॉटरप्रूफ आहे. कॅमऱ्यात ऑडिओ व एचडी कॅमेरा असल्याने व्हिडीओ स्पष्टपणे रेकार्ड होते. ३२ जीबी स्टोरेज असलेल्या या कॅमेऱ्यात आठ तासांची रेकॉर्डिंग क्षमता आहे. हा कॅमेरा वापराणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी नियंत्रण कक्षातूनदेखील कनेक्ट राहता येणे शक्य आहे.
/////////////
असे फायदे शक्य
पोलीस आणि नागरिकांत समन्वय
वर्दीवर कॅमेरा असल्यामुळे कुणी अकारण वाद घालणार नाही.
धूमस्टाईल बाईक चालविणाऱ्यांवर अंकुश
सिग्नल, वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध ‘रामबाण’
छेडखानी करणाऱ्यांवरही राखता येऊ शकतो अंकुश
/////////////
कोट
डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त