लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाºया भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावतीतर्फे १६ ते ३० जुलैपर्यंत १०० बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण बससाठी ५० टक्के, तर शिवशाही स्लिपरकोचसाठी ३५ टक्के टिकीट दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसाठी ही सेवा पर्वणी ठरेल, असा विश्वास विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी व्यक्त केला.अमरावती-पंढरपूरकरिता ५० फेऱ्या सोडण्यात येणार असून, परतीच्या मार्गाला पंढरपूर- अमरावतीकरिता ५० फेºया सोडण्यात येतील, असे गभणे म्हणाले.२३ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी विदर्भातून भाविकांची मोठी गर्दी राहते. भाविकांची कुठलीही गैरसौय होऊ नये म्हणून अमरावती आगारातून रोज सायंकाळी ६ वाजता शिवशाही आरामदायी स्लिपरकोच बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसची टिकीट भाविकांना अमरावती- पंढरपूरकरिता १५०० रूपये मोजावे लागतील, तर सर्वसाधारण बससाठी ६५० रूपये टिकीट राहील.पंढरपूरसाठी १०० बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकडे आमचे पूर्ण लक्ष राहील. ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण बससह शिवशाहीतही सूट दिली आहे.- श्रीकांत गभणे,विभाग नियंत्रक, अमरावती
पंढरपूरसाठी १०० बसफेऱ्यांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 10:11 PM
पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाºया भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावतीतर्फे १६ ते ३० जुलैपर्यंत १०० बसफेºयांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण बससाठी ५० टक्के, तर शिवशाही स्लिपरकोचसाठी ३५ टक्के टिकीट दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसाठी ही सेवा पर्वणी ठरेल, असा विश्वास विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के प्रवास सवलत