शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रोहयोचा आराखडा १० हजार कोटींचा, मजुरांच्या हाताला मिळणार काम, ५,२९१४२ कामे प्रस्तावित

By जितेंद्र दखने | Published: March 20, 2024 11:13 PM

Amravati News: अमरावती जिल्हा परिषदेने सन २०२४-२५ या वर्षातील रोजगार हमी योजनेचा १० हजार १०५ कोटी ३५ लाख ७० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हा परिषद सीईओ तथा प्रशासक यांनी १५ मार्च रोजी मंजुरीही दिली आहे.

- जितेंद्र दखनेअमरावती - जिल्हा परिषदेने सन २०२४-२५ या वर्षातील रोजगार हमी योजनेचा १० हजार १०५ कोटी ३५ लाख ७० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हा परिषद सीईओ तथा प्रशासक यांनी १५ मार्च रोजी मंजुरीही दिली आहे. या आराखड्यात ५ लाख २९ हजार १४२ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे गावोगावच्या नागरिकांच्या हाताला काम मिळणार आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगारांना गावातच हक्काचा रोजगार मिळावा, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्याची मुभा ग्रामपंचायतींना दिली. यासाठी ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. रोजगार हमी योजनेतून ग्रामीण शेतकरी, शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायतराज संस्थांना बळकट केले जात आहे. रोहयो अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षातील कामांचे नियोजन केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओ तथा प्रशासक संजिता मोहपात्रा यांनी मंजुरी दिली आहे. तालुकानिहाय समाविष्ट कामेजिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या वार्षिक कृती आराखड्यात तालुक्यातील कामांचा समावेश केला आहे. अचलपूर ९९९९३, अमरावती २०५८७, अंजनगाव सुर्जी १७१३७, भातकुली ५४६००, चांदूर रेल्वे ३४९३, चांदूर बाजार १८९७०, चिखलदरा १०६८३२, दर्यापूर १२०७२, धामणगाव रेल्वे ४१७३, धारणी ५६१८७, मोर्शी २९१४३, नांदगाव खंडेश्वर ४१३६४, तिवसा २०३८१, वरूड ४४२१० अशी एकूण ५ लाख २९ हजार १४२ वैयक्तिक व सार्वजनिक कामांची संख्या आहे. आराखड्यात या कामांचा समावेशया आराखड्यात काँक्रीट रस्ता, ग्रामपंचायत विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रामपंचायत भवन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, नाला खोलीकरण, पाणंद रस्ता, पेव्हर ब्लॉक बसविणे, फळबाग लागवड, बंदिस्त गटार, रस्ता काँक्रिटीकरण, वृक्षलागवड, नाडेफ खत, सार्वजनिक शेततळे, सार्वजनिक शोषखड्डा, सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढणे, ओढा खोलीकरण, तलाव गाळ काढणे, दगडी बांध, माती नालाबांध, सीसीटी, अंगणवाडी इमारत, रोपवाटिका, शालेय स्वयंपाक घर, शाळा अंगणवाडी किचन शेड, शाळा परिसर बंदिस्त गटार, शाळा परिसरात शोषखड्डा, संरक्षण भिंत, गांडूळ खत युनिट, कुक्कुटपालन शेड, बांबू लागवड, सिंचन विहीर अशी कामे केली जाणार आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती