शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

१०,२१८ शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी

By admin | Published: May 07, 2017 12:04 AM

जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रात अद्याप १ हजार २१८ शेतकऱ्यांची १ लाख ९४ हजार ४९२ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे.

तूर केंद्राची सद्यस्थिती : यार्डात १.९४ लाख क्विंटल मोजणी शिल्लकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रात अद्याप १ हजार २१८ शेतकऱ्यांची १ लाख ९४ हजार ४९२ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. शुक्रवारपर्यंत ११ केंद्रांवर ३ हजार ८०१ शेतकऱ्यांची ७७ हजार ५५३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.२७ एप्रिल रोजी राज्य शासनाद्वारे तूर खरेदीचा निर्णय घेतला. २ मे नंतर खऱ्या अर्थाने तूर खरेदीला सुरुवात झाली. आतापर्यंत व्हीसीएमएफच्या चांदूररेल्वे केंद्रावर १४५ शेतकऱ्यांची २१६२.२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. नांदगाव केंद्रावर २२० शेतकऱ्यांची ४०७९.३१ क्विंटल, मोर्शी केंद्रावर ५६० शेतकऱ्यांची १८ हजार ७०६ क्विंटल, अमरावती केंद्रावर २६२० शेतकऱ्यांची ४६ हजार क्विंटल व धामणगाव रेल्वे केंद्रावर ४३२ शेतकऱ्यांची २१ हजार २५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. डीएमओंतर्गत अचलपूर केंद्रावर २३७९ शेतकऱ्यांची ४७ हजार ३२६ क्विंटल, अंजनगाव सुर्जी केंद्रावर ११२६ शेतकऱ्यांची २१ हजार ७०३ क्विंटल, चांदूरबाजार केंद्रावर १६१० शेतकऱ्यांची १९ हजार ८३५ क्विंटल, दर्यापूरात ३६२१ शेतकऱ्यांची ४९ हजार ६९६ क्विंटल, वरूड केंद्रावर ९८२ शेतकऱ्यांची ३३ हजार ९१ तसेच धारणी येथील आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने १७४ शेतकऱ्यांची तीन हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधक, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याद्वारा केंद्रावर रोज भेट देण्यात येत असल्याने येणाऱ्या अडचणीवर लगेच तोडगा काढण्यात येत असल्याने तूर खरेदी व मोजणीचा वेग वाढला आहे. व्यापाऱ्यांद्वारे ८.२३ लाख क्विंटल तूर खरेदीयंदाच्या हंगामात व्यापाऱ्यांद्वारे ८ लाख २३ हजार ९२५ क्विंटल तुरीची हमीपेक्षा कमी भावाने खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे ५,७३०.७७ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर ३,८४७, मोर्शी -३१,६४२ क्विंटल, अमरावती ३,२१,८५२ क्विंटल ,धामणगाव ७४,३५८, अचलपूर ८० हजार, अंजनगाव सुर्जी ५७,७४३, चांदूरबाजार ७६,२६१, दर्यापूर १,६२,३४७, वरूड ५,८००, धारणी ३,८४७, तिवसा येथील बाजार समितीत ४९७ क्विंटल तूर व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे.