शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

१०६ ग्राहकांची वीजचोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:13 AM

अमरावती : मीटरमध्ये छेडछाड करणे, ज्या कामासाठी वीज घेतली त्यानुसार वापर न करता त्याचा कमर्शियलकरिता वापर करणे तसेच डायरेक्ट ...

अमरावती : मीटरमध्ये छेडछाड करणे, ज्या कामासाठी वीज घेतली त्यानुसार वापर न करता त्याचा कमर्शियलकरिता वापर करणे तसेच डायरेक्ट विद्युत तारेवरून हूक टाकणे अशाप्रकारे वीजचोरी करणाऱ्या १०६ वीजग्राहकांना महावितरणाच्या स्थानिक पथकाने कारवाई करून वीजचोरी पकडली. ही कारवाई गत वर्षभरातील असल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कलम १३५ ते १३६ नुसार वीजचोरीची दंडात्मक रक्कम भरण्याची संधी दिली जाते. रक्कम न भरल्यास एफआयआर केला जातो. अशाप्रकारे एकूण ९६ ग्राहकांनी २,२६,५१५ युनिटची वीजचोरी केली आहे. त्याची रक्कम ३४.८४ लाख इतकी आहे. त्यापैकी ७१ लोकांकडून २६.६० लाख वीजचोरीची रक्कम वसूल केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

१० जण हूक टाकताना आढळले

ज्या कामासाठी वीज घेतली, त्याकामासाठी त्याचा वापर न करता त्याचा व्यवसायिक किंवा वाणिज्य वापर होत असेल, तर कलम १२६ नुसार हा गुन्हा ठरतो. अशा तारेवर हूृक टाकून वीजचोरी करणाऱ्या ५० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० जणांनी हूक टाकून वापरल्याचे महावितरणला आढळून आले. त्यांनी ९०२३ युनिट विजेची चोरी केली असून त्याची रक्कम १ लाख २९ हजार एवढी आहे. १० पैकी पाच जणांकडून ४२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

बॉक्स:

अशी आहे कारवाईची तरतूद

वीजचोरीचे कलम १२६ अंतर्गत ज्यासाठी वीज घेतली, त्यासाठीच त्याचा वापर न करता इतर बाबींसाठी केल्यास त्याला वाणिज्यिक दर लावून त्याचे बिलिंग केले जाते. पैसे न भरल्यास एफआयआर दाखल केला जातो.

कलम १३५ ते १३८ अंतर्गत थेट वीजचोरी करणे, यामध्ये तारेवर हूक (आकोडा) टाकून वीजचोरी करणे, मीटरला बायपास करणे, मीटरला आतून छिद्र पाडून मीटरमध्ये रेजिस्टंस तयार करून मीटरची गती कमी करणे, मीटरमध्ये रिमोट कंट्रोल किट बसविणे आदीद्वारे वीजचोरी केली जाते. याची तक्रार पोलिसांतसुद्धा दाखल केली जाते.

कोट

अधीक्षक अभियंत्यांचा कोट आहे.