गजानन मोहोड, अमरावती: शासन हिस्सा जमा नसल्याने विमा कंपनीद्वारा चार महिन्यांपासून आंबिया बहराचा विमा रखडला होता. आता सोमवारी ६३.९८ कोटींचा शासन हिस्सा जमा झालेला आहे. त्यामुळे ३,१५६ संत्र्यासह फळ उत्पादकांना परतावा मिळणार आहे. दोन आठवड्यांत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ मध्ये आंबिया बहरासाठी जिल्ह्यातील ३,५५७ संत्रा, मोसंबी, केळी उत्पादकांनी फळ विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. पिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, यासाठी शेतकऱ्यांनी पाच टक्के याप्रमाणे हेक्टरी १२ हजार रुपये भरून आंबिया बहराचे ३,३२० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केल होते. यासाठी कंपनीकडे १३.९३ कोटींचा प्रीमियम जमा झाले आहेत.