अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या ईयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर केला. यात अमरावती विभागाने ९३.२२ टक्के मिळवित राज्यात सहाव्या क्रमांकाने येण्याचा बहुमान पटकाविला आहे. तर विभागातून मुलींनी ९५.२० टक्के मिळवित त्या सरस ठरल्या आहेत.
अमरावती विभागात बारावीच्या परीक्षेत १ लाख ५६ हजार ५७३ विद्यार्थी परीक्षार्थी होते. त्यापैकी १ लाख ४५ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात मुले ९०. ५४ तर मुलींचे ९५.२० टक्के उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. मुले ७६६६३ तर मुली ७०४९७ झाल्या आहेत. एकंदरीत वाशिम जिल्ह्याने ९५.१९ टक्के गुण मिळवित अमरावती विभागात आघाडी घेतली असून, ९१.४९ टक्के मिळवित यवतमाळ जिल्हा माघारला आहे. बुलढाणा जिल्हा दुसरे, अकोला तिसरे, अमरावती जिल्हा चौथा, तर यवतमाळ जिल्हा पाचव्या स्थानी राहिला आहे.अमरावती विभागाचा जिल्हानिहाय निकाल
जिल्हा - परीक्षार्थी - उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारी
- अकोला - २४७१९ - २३१४४ - ९३.६२
- अमरावती - ३७८१६ - ३५१३९ - ९२.९२
- बुलढाणा - ३८९८३ - ३६६०७ - ९३.९०
- यवतमाळ - ३६०८९ - ३३०२१ - ९१.४९
- वाशिम - १८९६६ - १८०५४ - ९५.१