धारणी : तालुक्यातील बोरी गावातील सज्जू नंदा जामूनकर या आदिवासी शेतकऱ्याच्या ११ बकऱ्या तलावातील पाणी पिल्याने दगावल्या. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने तलावाच्या पाण्यामध्ये विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.बोरी गावातील सज्जू जामुनकर या आदिवासी शेतकऱ्यांचा मुलगा मुकेश (१३) शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या तलावाशेजारी घेऊन गेला होता. बकऱ्या तलावाच्या काठाकाठाने चरल्यानंतर पाणी पिण्यासाठी तलावाकडे वळल्या. पाणी पिल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत एकापाठोपाठ सर्वांनीच माना खाली टाकून जमिनीवर लोळायला सुरुवात केली. काही वेळातच त्या दगावल्या. मुकेशने घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. त्यांनी लगेच तलावाकडे धाव घेतली ते पोहोचेपर्यंत सर्व बकऱ्या दगावल्या होत्या. सज्जू जामुनकर यांनी धारणी पोलिसांत शनिवार दुपारी तीनच्या तीन वाजताच्या दरम्यान तक्रार नोंदवली. पोलिसांनी तलावावर जाऊन चौकशी केली. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. रविवारी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तलाव ठिकाणी जाऊन बकºयांची पाहणी केली. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.तलावाशेजारी वन्यप्राण्यांचा वावरलघु सिंचन विभागाचा हा तलाव वनविभागाच्या जंगलाशेजारी वसलेला आहे. त्यामुळे या तलावावर पश्चिम मेळघाट वनविभागांतर्गत येणाऱ्या जंगलातील वन्यप्राणीसुद्धा तहान भागविण्याकरिता येतात. कदाचित त्या वन्यप्राण्यांच्या हत्येकरिता तलावात विषप्रयोग झाला नसेल ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने वनविभागाचे अधिकारी, कर्मचारीसुद्धा जंगलात जाऊन तपास कामाला लागले आहेत.
तलावातील पाणी पिल्याने ११ बकऱ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:29 AM
तालुक्यातील बोरी गावातील सज्जू नंदा जामूनकर या आदिवासी शेतकऱ्याच्या ११ बकºया तलावातील पाणी पिल्याने दगावल्या. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने तलावाच्या पाण्यामध्ये विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देबोरी येथील घटना : पाण्यात विष टाकल्याचा संशय