२६ रिव्हॉल्व्हर, १२ बोअरगन : शहरातील गुन्हेगारीवर दररोज 'वॉच'मोहन राऊत अमरावतीमहापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्वत:च्या व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी देण्यात आलेली ११२ शस्त्रे शासनजमा करण्यात आली आहे़ दरम्यान अमरावती शहरात व ग्रामीण भागात घडणाऱ्या दैनंदिन गुन्हेगारीवर पोलीस प्रशासन व निवडणूक विभागाचा 'वॉच' आहे़ अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात २६ जणांजवळ रिव्हॉल्वर आहेत़ १२ बोअरगन व इतर बंदुकी असा ६८ जणांकडे शस्त्रपरवाना आहेत़ जिल्ह्यात ११२ जण शस्त्रपरवाना धारक आहे़त यात अचलपूर तालुक्यात तब्बल २३ जणांनी परवाना घेतला आहे़ दुसऱ्या क्रमांकावर वरूड तर तिसऱ्या क्रमांकावर मोर्शी तालुका आहे़ धामणगाव तालुक्यातील पाच जणांंकडे शस्त्रपरवाना आहे़ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोघांकडे हा परवाणा आहे़ अमरावती शहरातील शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे़ अमरावती महानगरपालिका व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी १० दिवस शिल्लक असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत, ती शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश मागील आठवड्यात प्रशासनाने दिले होते़ संबंधित शस्त्र परवानाधारकांना केवळ पाच दिवसांचा अल्टिमेटम प्रशासनाने दिला होता़ गत दोन दिवसांत जिल्ह्यातील ११२ शस्त्र परवाना धारकांनी आपले शस्त्र पोलीस प्रशासनाच्या हवाली केले आहेत़ संबंधित शस्त्रपरवाना धारकांना रीतसर पोच पावती देण्यात आली असून निवडणुकीचा निकाल व आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही शस्त्रे संबंधितांना परत करण्यात येणार आहे़त. गुन्हेगारीवर दररोज 'वॉच'महानगरपालिका व ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यांकडे पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष आहे़ घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत आहे़ यामागे निवडणुकीचा तथा मतदानाचा काही संबंध आहेत का यासंबंधीच्या गुन्हेगारीवर पोलीस व निवडणूक प्रशासनाचा वॉच आहे़बोगस मतदारांवर फ ौजदारी कारवाईज्या मतदारांनी नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत मतदान केले़, त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही़, अशी नावे आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करून संबंधित मतदारांच्या नावाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने यंत्रणेला दिले आहेत़मतदारांच्या वाहतुकीस कारवाई४मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर खासगी वाहनाने मतदारांना आणण्याचे प्रकार होतात़ यावर आता आयोगाची नजर राहणार आहे़ ज्या वाहनातून मतदार येत असेल ते वाहन त्वरित जप्त करून वाहनचालक व वाहन मालकावर थेट कारवाई होणार आहे़
११२ शस्त्रे शासनजमा
By admin | Published: February 12, 2017 12:10 AM