शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 09, 2024 7:29 PM

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र

अमरावती : महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी केली होती. मात्र, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. पश्चिम विदर्भात २०२३ मध्ये म्हणजेच ३६५ दिवसांत तब्बल ११४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या आहेत. हे सर्व शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.

पश्चिम विदर्भात दर दिवशी तीन म्हणजेच दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे विदारक चित्र आहे. याची कारणे शोधण्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक दिवस अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील आदिवासीबहुल शेतकऱ्याच्या घरी एक दिवस मुक्कामी राहिलेत. त्यानंतर त्यांनी शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा कार्यक्रम दिला व शेतकरी आत्महत्या होण्यामागची कारणे व अहवाल मागितला. शासनाचा उद्देश चांगला असला तरी अभियान मात्र फोटोसेशनपुरते मर्यादित राहिले.

पश्चिम विदर्भात गेल्या वर्षभरात ११४० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये शासन मदतीसाठी ५१७ प्रकरणे पात्र ठरली. याशिवाय ३१७ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत, तर ११ महिन्यांपासून तब्बल २३५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने शासन-प्रशासन याविषयी गंभीर नसल्याचा आरोप होत आहे.

सन २००१ पासूनची स्थितीआतापर्यंत शेतकरी आत्महत्या : २०,००६शासन मदतीसाठी पात्र प्रकरणे : ९,३७३आतापर्यंत अपात्र प्रकरणे : १०,३९८चौकशीसाठी अद्याप प्रलंबित : २३५शेतकरी आत्महत्यांची प्रथमदर्शनी कारणे१) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार पश्चिम विदर्भात जानेवारी महिन्यात १०३, फेब्रुवारी ७३, मार्च १०३, एप्रिल ८६, मे १०६, जून ९६, जुलै ८६, ऑगस्ट १०१, सप्टेंबर १०७, ऑक्टोबर १०४, नोव्हेंबर ८७, डिसेंबरमध्ये ८८२) शेतकरी आत्महत्या होण्यामागे नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, बँकांचे व खासगी सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपण व यासह इतर बाबींमुळे येणारा मानसिक तणाव कारणीभूत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ