शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

१२ ग्रामपंचायती, ४३४ सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:36 AM

अमरावती : एकही उमेदवारी अर्ज नसल्याने जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती व ४३४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय १६ जागांवर ...

अमरावती : एकही उमेदवारी अर्ज नसल्याने जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती व ४३४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय १६ जागांवर निवडणूक अर्ज दाखल न झाल्याने तेथील सदस्यपद रिक्त राहिले आहे.

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये १२ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात ५४१ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदसावंगी, सातरगाव, पिंपरी निपाणी, सुलतानपूर, तिवसा तालुक्यात ठाणाठुणी, चांदूर रेल्वे तालुक्यात येरड, धामणगाव रेल्वे तालुक्यात काशीखेड, निंबोरा बोडखा, मोर्शी तालुक्यात लिहिदा, पाळा, चांदूर बाजार तालुक्यातील वडुरा व अचलपूर तालुक्यात दर्याबाद या ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत.

निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे दर्यापूर तालुक्यात पाच, अचलपूर चार व धारणी तालुक्यात सात अशा एकूण १६ जागा प्रभाग रिक्त असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले. ४३४ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३०, भातकुली ३६, नांदगाव खंडेश्वर ५६, दर्यापूर २२, अंजनगाव सुर्जी ३२, तिवसा १५, चांदूर रेल्वे १६, धामणगाव रेल्वे २६, अचलपूर ३८, चांदूर बाजार ४१, मोर्शी ३४.वरुड १०, धारणी ४३ व चिखलदरा तालुक्यातील ३५ सदस्यांचा समावेश आाहे.

बॉक्स

४४५२ जागांसाठी निवडणूक

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ४४५२ सदस्यपदांसाठी आता १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३८६, भातकुली २७६, नांदगाव खंडेश्वर ३६३, दर्यापूर ४१७, अंजनगाव सुर्जी २८०, तिवसा २४६, चांदूर रेल्वे २१९, धामणगाव रेल्वे ४३१, अचलपूर ३६४, चांदूर बाजार ३४०, मोर्शी ३१४, वरुड ३६९, धारणी २८३ व चिखलदरा तालुक्यात १६४ जागांचा समावेश आाहे.