शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

१२ लाखांवर केळी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 1:23 AM

वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत.

ठळक मुद्दे२१ जूनच्या वादळातही उद्ध्वस्त : शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत. आधी उन्हान आणि आता वादळाने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.अचलपूर कृषी उपविभागांतर्गत अचलपूर तालुक्यातील ३८० हेक्टर क्षेत्रांपैकी १८७.७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी करपली, तर अंजनगाव तालुक्यातील ४५१ हेक्टरपैकी २१७ हेक्टर क्षेत्रातील केळी वाढते तापमान आणि उन्हामुळे भाजल्या गेली. केळीचे घड बरोबर निसवले नाहीत. केळीच्या घाडांची संख्या कमी असून घडातील वरच्या फण्याही करपल्या आहेत.२१ जूनच्या तुफान वादळामुळे केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत. दोन्ही तालुक्यातील केळीचे बहुतांश पीक यात खराब झाले आहे. दरम्यान २१ जूनच्या सायंकाळी वादळाने केळीची झाडे घडांसह जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील चमक येथील सरला सुखदेव पवार यांच्या ८० आर शेतातील संपूर्ण केळी वादळाने झोपली. चमकसह हरम, खानापूर, नवबाग, शहापूर, दारापूर शिवारात प्रचंड नुकसान झाले. सदर नुकसानाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.असे झाले नुकसानअचलपुरतील वेणी येथील मंगेश बुंदेले यांच्या शेतातील ४ हजार केळीची झाडे, प्रल्हाद बदुकले यांच्या शेतात तीन हजार, वडगाव फत्तेपूर येथील सुंदरलाल चौधरी यांच्या शेतातील तीन हजार, तर अंजनगावमधील पांढरी खानापूर येथील रवींद्र डाबरे यांच्या शेतातील ३ हजार २५ केळीची झाडे उन्हामुळे करपल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विशेष तज्ज्ञांनी आपल्या पाहणी अहवालात म्हटले आहे.विशेषतज्ज्ञांचा अभिप्रायअधिक तापमानामुळे बागेतील तापमान वाढले. आर्द्रता कमी झाली. बाष्पीभवनाचा वेग वाढला. याचा परिणाम झाडांच्या वाढीवर झाला. घड बरोबर निसवले नाहीत. जे घड निसवलेत त्याच्या वरील बाजूच्या फण्यासुद्धा तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपल्याचा अभिप्राय कृषी विद्यापीठासह कृषी विभागातील विशेष तज्ज्ञांनी दिला आहे.शेतकऱ्यांची मागणीमोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झाल्यामुळे केळी पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे हवालदिल शेतकºयांनी केळी पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याकरिता अचलपूर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अंजनगाव तहसीलदारांकडे शेतकºयांसह राजकीय, सामाजिक मंडळींनी निवेदने दिली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती