लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर येथील तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत तालुक्यातील १२ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापर न करता, धान्यवाटप केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. रेशनचे हे धान्य कार्डधारक लाभार्थींना देण्यात आले किंवा नाही, याची तपासणी सुरू केल्याने काळाबाजार करणाऱ्या भ्रष्ट रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शासनाच्या नवीन आदेशानुसार सर्व रेशन धान्य दुकानाचे कामकाज आॅनलाइन करण्यात आले आहे. कुटुंबप्रमुखाच्या बोटांच्या ठशांच्या आधारे रेशन दुकानातून धान्य घेतल्याची खात्री केली जाते. त्यानंतर संबंधित कार्डधारकाला रेशनचे धान्य दिले जाते. स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार गोरगरिबांचे धान्य खुल्या बाजारात विकून भ्रष्टाचार करीत असल्याच्या शेकडो तक्रारीनंतर शासनाने आॅनलाइन मशीनचा वापर सुरू केला आहे.१०० टक्के आॅनलाइन थम्ब मशीनचा वापर करण्याचे आदेश असताना, तालुक्यातील सुमारे १२ दुकानदारांनी ५० टक्क््यांपेक्षा कमी प्रमाणात वापर केला असल्याचा ठपका निलंबित करण्यात आलेल्या रेशन धन्य दुकानदारांवर ठेवण्यात आला आहे.यांची झालीत दुकाने निलंबितअचलपूर तालुक्यातील असदपूर येथील सेवा सहकारी सोसायटी, परतवाडा येथील आर.आर. भगत, पांढरी येथील एम.एम. राजने, नरसिंगपूर येथील आर.डी. व्यवहारे, अचलपूरचे एच.ए. शहा, जी.बी. शिरस्कर, देवमाळी येथील एम.पी. शेरेकर आदींची दुकान परवाने निलंबित करण्यात आले.सतत केले आदेशाचे उल्लंघनतहसीलदार निर्भय जैन यांनी २ जून रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला होता. दुकानदारांना मार्च आणि एप्रिलचे धान्य २६ एप्रिल व २९ मे रोजी पोहोचते केले तरी ५० टक्क्यांपेक्षा कमी धान्य वितरण आढळून आले. जुलै महिन्यातसुद्धा तीच परिस्थिती होती. महाराष्ट्र अनुसूचित वस्तू अधिनियम १९७५ चे कलम १८ (२) अंतर्गत अटीचे उल्लंघन केल्यामुळे कायद्याच्या कलम ३ नुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी कारवाई केली.कार्डधारक अन्य दुकानाला संलग्नकार्डधारकांची गैरसोय टाळण्याकरिता नजीकच्या रेशन दुकानांशी जोडण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले. रेशनचे धान्य कार्डधारकाला दिले गेले किंवा नाही, यासंदर्भात ५० टक्के कार्डधारकांचे बयान घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यात अपहार उघड झाल्यास फौजदारी कारवाईची शक्यता आहे.संबंधित दुकानदारांनी शासननियमानुसार ई-पॉस मशीनचा वापर न करता धान्यवाटप केले. सूचना देऊनसुद्धा अहवाल सादर केला नाही. तसा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाºयांना पाठविल्यावर सात दुकाने निलंबित करण्यात आली आहेत.- निर्भय जैन, तहसीलदार
१२ रेशन दुकाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:38 PM
अचलपूर येथील तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत तालुक्यातील १२ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापर न करता, धान्यवाटप केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. रेशनचे हे धान्य कार्डधारक लाभार्थींना देण्यात आले किंवा नाही, याची तपासणी सुरू केल्याने काळाबाजार करणाऱ्या भ्रष्ट रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देअनियमितता भोवली : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई