शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

१२ वेळा मान्सून लेटलतीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:08 PM

यंदा जून महिन्याची अखेर असतानाही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. दोन दिवसांत तुरळक, तर २ जुलैनंतर सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील ६९ वर्षात तब्बल १२ वेळा मान्सूनने हुलकावणी देत जुलैमध्ये दाखल झाला. आजवर २००३ मध्ये २५ जुलै रोजी झालेले मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे, तर १९९० मध्ये ५ जून हे मान्सूनचे वेळेपूर्वीचे आगमन ठरले.

ठळक मुद्दे६९ वर्षांमध्ये आगमनात वैविध्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जून महिन्याची अखेर असतानाही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. दोन दिवसांत तुरळक, तर २ जुलैनंतर सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील ६९ वर्षात तब्बल १२ वेळा मान्सूनने हुलकावणी देत जुलैमध्ये दाखल झाला. आजवर २००३ मध्ये २५ जुलै रोजी झालेले मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे, तर १९९० मध्ये ५ जून हे मान्सूनचे वेळेपूर्वीचे आगमन ठरले.दरवर्षीच मान्सूनच्या आगमनात वैविध्य आहे. यंदा ‘एल निनो’चा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे सरासरीइतपत पाऊस होण्याचे भाकीत हवामान विभागाने केले होते तसेच साधारणपणे १२ ते १५ जूनच्या दरम्यान विदर्भात मान्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामानविभागाने वर्तविली होती. प्रत्यक्षात अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावली व नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशिरा मान्सूनची वाटचाल सुरू झाली. मागील आठवड्यात मुंबई अन् या चार दिवसांत मराठवाड्यात पाऊस होत असताना मध्य विदर्भात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात पावसाने दाद दिलेली नाही.कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत १२ वेळा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. यामध्ये १९९० मध्ये ५ जून, २००० मध्ये ६ जून, १९८० मध्ये ७ जून, १९९४ मध्ये ७ जून, १९९१ मध्ये १० जून, १९९८ मध्ये ११ जून, २०१३ मध्ये ११ जून, २०१२ मध्ये १२ जून, १९७३ मध्ये १३ जून, १९९३ मध्ये १३ जून, तर १९७७ मध्ये १३ जून हे मान्सूनच्या वेळेवर आगमनाचे दिवस ठरले आहे.यंदा मात्र जूनची अखेर असतानाही दमदार पाऊस झालेला नाही. किंबहुना रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली आहे. यंदा रोहिणीत प्रीमान्सूनचा पाऊस झालेला नाही. भूजलाची पातळी खालावल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पूर्वमोसमी पेरण्या झालेल्या नाहीत. पावसात सातत्य नसल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार आहे.जिल्ह्यात सरासरी६० मिमी पाऊसजिल्ह्यात १ ते २९ जून दरम्यान १४१ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६० मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच दिनांकाला ८९.६ मिमी पाऊस पडला होता. यंदा अमरावती ६१.९, भातकुली ६१.२, नांदगाव ५९, चांदूर रेल्वे ६८, धामणगाव रेल्वे ८०.५, तिवसा १२.३, मोर्शी ४१.६, वरूड ३८.१, अचलपूर ५८.३, चांदूरबाजार ५८.६, दर्यापूर ५३.७, अंजनगाव सुर्जी ३७.४, धारणी ११५.८ व चिखलदरा तालुक्यात ९३.८ मिमी पाऊस पडला आहे.हवामानाची सद्यस्थितीहवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार, ३ जुलैपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते. त्यामुळे हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. ३ ते ५ जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. खरिपाच्या पेरणीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.यंदा २३ जूनला मान्सूनचे आगमन झाले असले तरी सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. आता १ जुलैनंतर दमदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ३० जूनपासून खरिपाच्या पेरणी करावयास हरकत नाही.- अनिल बंड, हवामानतज्ज्ञमान्सूनचे उशिरा आगमनकृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १९८२ मध्ये २० जुलै, १९८३ मध्ये १२ जुलै, १९८४ मध्ये १ जुलै, १९९५ मध्ये ९ जुलै, १९९६ मध्ये २१ जुलै, १९९९ मध्ये ९ जुलै, २००२ मध्ये १७ जुलै, २००३ मध्ये २५ जुलै, २००४ मध्ये १० जुलै, २०१० मध्ये ७ जुलै, २०१४ मध्ये ११ जुलै तसेच यंदादेखील जुलै महिना उजाडणार आहे. ४० वर्षांमध्ये मान्सूनचे १ ते ३० जूनच्या कालावधीत आगमन झालेले आहे.