अमरावती : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी आवश्यक रेमडिसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनची अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत पुरेशी उपलब्धता असल्याचे अन्न व औषधे प्रशासन सहआयुक्त वि. द. सुलोचने यांनी बुधवारी सांगितले.
अमरावती जिल्ह्यात रेमडिसिविर इंजेक्शनचे १२ हजार १८६ युनिट्स व ८.३७ वायू उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी रेमडिसिविर इंजेक्शनचे ८४६ युनिट्स व ११.०९ मे. टन प्राणवायू उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी रेमडिसिविर इंजेक्शनचे ३ हजार ३३८ युनिट्स व ८.९ मे. टन प्राणवायू उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार आणखी औषधे उपलब्ध होणार असल्याचे सुलोचने यांनी सांगितले. सर्व ठिकाणी सामग्री उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अडचणीच्या वेळी प्रशासनाशी संपर्क साधावा. भविष्यात गरज लक्षात घेऊन आणखी सामग्री उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले.