अमरावती: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या महिन्यात बारावीची परीक्षा बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षांसाठीअमरावती विभागात बारावीकरिता १ लाख ४९ हजार ८६० विद्यार्थी प्रविष्ट आहेत. बारावीसाठी ५३७ केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था केली आहे. ही परीक्षा सुरळीत होण्यासाठी मंडळाने ९ भरारी पथकांची गठित केली आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा घेतली जाते.
मागील काही वर्षांपासून गुणवत्ता यादी बाद करण्यात आली आहे. असे असले तरी या परीक्षांचे महत्त्व कमी आले नाही. या परीक्षांमध्ये बदल करत ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’च्या आधारे पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिले जातात. त्यामुळे परीक्षेचा गुणवत्ता यादी घोषित करणे बंद झाले असले, तरी विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा १ लाख ४९ हजार ८६० विद्यार्थी त्यांचे भाग्य आजमावत आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान होणार आहे. या परीक्षेकरिता विभागात ५३७ केंद्र संचालक व एवढेच रणर नियुक्त केले आहेत.
रणरची मात्र दररोज बदल केला जाणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. इयत्ता बारावीच्या परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रतितास २० मिनिटे अवधी जादा मिळणार आहे. जसे पेपर ३ तासांचा असल्यास चार तास पेपर सोडविण्यासाठी मिळणार आहे. याशिवाय परीक्षा केंद्रात वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव नीलिमा टाके यांनी दिली.जिल्हानिहाय विद्यार्थीजिल्हा-बारावीअकोला-२५८७६अमरावती-३६०७०बुलडाणा-३४७५७यवतमाळ-३२९५५वाशिम २०२०२