संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वडाळी बांबू उद्यानात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगुलांचाही शिरकाव वाढला आहे. त्यांच्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता परिसरात महिनाभरापूर्वी १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.कॅमेरांद्वारे प्रेमीयुगुलांवर नजर रोखली गेली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून इतर बारीक हालचालीही कॅमऱ्याद्वारे टिपल्या जात असल्याची माहिती येथील वनपालांनी दिली आहे. या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली झाल्या, तर पोलिसांनाही पाचारण करण्यात येते. परिसरात दामिनी पथकाचीही गस्त राहत असल्याची माहिती आहे. प्रेम करणे गुन्हा नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे गुन्हा ठरतो. त्याकारणाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून वनविभागाने सदर पाऊले उचललेली आहे. अनेकदा अश्लील चाळे करणाऱ्या युगुलांना दामिनी पथकाने कारवाई करून समज दिली आहे. त्यांच्या पालकांना पोलिसांनी बोलावून मुला-मुलींचे कान उपटले आहेत.वनविभागाने आतापर्यंत कारवाई केली नसली तरी येथे कार्यरत असलेले खासगी सुरक्षा रक्षक व सतत गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांची अशा युगुलांवर करडी नजर असल्याची माहिती वडाळी बांबू रोपवाटिकाचे वनपाल सलीम शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाईसार्वजनिक ठिकाणी प्रेमीयुगुल अश्लील चाळे किंवा वर्तन करताना पोलिसांना आढळून आले व जरी ती १८ वर्षांवरील असतील तरी मुंबई पोलीस अधिनियम( बीपीअॅक्ट) कलम १० नुसार कारवाईची तरतूद आहे. यामध्ये प्रेमीयुगुलांना ताकीद देवून सोडण्यात येते किंवा समज देण्यात येते किंवा प्रकरण फाईल करण्याचा अधिकार पोलिसांना राहतो. एकामेकांविरोधात तक्रार नसेल, तर २०० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. अनेकदा दोघांच्याही पालकांना बोलावून पाल्यांना समज देण्यात येत असल्याची माहिती शहर कोतवाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी दिली.येथे मागील महिन्यांत कॅमेरे लावण्यात आले आहेत. कॅमेºयांची निगराणी सर्वत्र असते. मात्र, या ठिकाणी सात सुरक्षा रक्षक व समितीतील कंत्राटी वनकर्मचाऱ्यांची गस्त नेहमीच या ठिकाणी राहते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून आम्ही दोन्ही वनपाल सतर्क राहतो.- सलीम शेख, वनपाल, वडाळी बांबू रोपवाटीका अमरावती.गैरवर्तन करणाºयांवर कॅमेराद्वारेनजर ठेवली जाते. आम्ही रेकॉर्डवर जरी कारवाई केली नसली तरी असा प्रकार आढळल्यास पोलिसांना माहिती देण्यात येते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकांचीही गस्त असते.- कैलास भुंबरवनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळीनागरिक येतात सहकुटुंबबांबू गार्डनमध्ये हिरवळ असल्याने उन्हाच्या दहकतेत शीतलता अनुभवण्यासाठी तसेच पर्यटन म्हणून पंचक्रोशीतील व इतर जिल्ह्यातील नागरिक आपल्या कुटुंबासह या ठिकाणी येतात. यामध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश असतो. अनेकदा प्रेमीयुग्ल नको ते वर्तन करताना त्यांना निदर्शनास येते. अशा वर्तनामुळे त्यांनाच दुसरे ठिकाण शोधावे लागते. कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ असल्याने प्रेमीयुगुलांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसू शकतो.
बांबू गार्डनमध्ये प्रेमीयुगुलांवर १३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:46 AM
वडाळी बांबू उद्यानात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगुलांचाही शिरकाव वाढला आहे. त्यांच्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता परिसरात महिनाभरापूर्वी १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.
ठळक मुद्देअश्लील चाळे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा : दामिनी पथकाचीही गस्त