शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

१३ रस्त्यांचे हस्तांतरण!

By admin | Published: April 14, 2017 12:06 AM

महापालिका क्षेत्रातील ६४ किलोमिटरचे १३ रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला युद्धस्तरावर सुरूवात करण्यात आली आहे.

‘पीडब्ल्यूडी’ महापालिकेच्या उंबरठ्यावर : प्रक्रिया सुरू, लांबी ६४ किमीप्रदीप भाकरे  अमरावतीमहापालिका क्षेत्रातील ६४ किलोमिटरचे १३ रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला युद्धस्तरावर सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वंकष प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील ६४ किलोमीटरचे रस्ते अवर्गिकृत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेची पायधूळ माथी लावणे सुरू केले आहे. प्रशासकीय स्तरावर सर्व सुरळीत झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतीेल १३ रस्ते अवर्गिकृत केले जातील. ते रस्ते देखभाल व दुरूस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येतील. महापालिका व नगरपालिका क्षेत्रातून जाणारे राष्ट्रीय व राज्य मार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगाव, लातूर आणि यवतमाळमधील रस्ते महापालिका आणि नगरपालिकांकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर राज्यातील अन्य नागरी स्थानिक संस्थांनी हे महामार्ग आपल्याकडे घ्यावेत, यासाठी बांधकाम विभाग सरसावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देखभाल दुरुस्तीची राहणार मेखअमरावती : महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गामुळे मद्यविक्रेत्यांवर संक्रांत कोसळली आहे. सध्या शहरातील बोटावर मोजण्याइतपत परमीटबार सुरू आहेत. मद्याची दुकाने पुन्हा सुरू व्हावीत, यासाठी आता शासनाने शहरातून जाणारे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे धोरण आखले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अमरावती महापालिका क्षेत्रातील राज्यमार्ग हस्तांतरित करण्यासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.सूत्रांनुसार, यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. बांधकाम विभागाने अशा १३ रस्त्यांची यादी तयार केल्याची खात्रीलायक माहिती आहे. पहिल्या टप्प्प्यात १३ पैकी केवळ पाच रस्ते हस्तांतरीत करण्याचा प्रस्तावही बांधकाम विभागाकडून महापालिकेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, महापालिकेकडे रस्ते हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पाठवित असताना देखभाल आणि दुरुस्ती अशी सोईस्कर खोच टाकण्यात येणार आहे. हे रस्ते अवर्गिकृत करीत असताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय किंवा बुडालेला महसूल अशी कुठलीही कारणे देण्यात येणार नाहीत. प्रत्यक्षात महापालिकेकडून रस्ते हस्तांतरणाचा कुठलाही प्रस्ताव तूर्तास दिलेला नाही.