शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

‘त्या’ काेविड रुग्णांना परत मिळणार १.३० कोटी, खासगी हॉस्पिटलला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 5:00 AM

गतवर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान शहरातील ८ खासगी कोविड रुग्णालयात अव्वाच्या सव्वा देयके आकारल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्राप्त झाली होती. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत पथक गठित केले होते. या पथकाने अमरावती शहरातील ८ खासगी काेविड हाॅस्पिटलची झाडाझडती घेतली. रुग्णांवर आकारण्यात आलेले देयके आणि शासनाने निश्चित केलेले दर या मोठी तफावत या पथकाला आढळून आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या ऑडिट पथकाचा अहवाल, शहरातील आठ रुग्णालयाची झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोविड रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा देयके आकारली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑडिट पथकाने अहवाल सादर केला असून, शहरातील आठ रुग्णालयांकडृून १ कोटी ३० लाख रुपये रुग्णांना परत करण्याचा निर्णय झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी याविषयी शिक्कामोर्तब करतील, हे विशेष.गतवर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान शहरातील ८ खासगी कोविड रुग्णालयात अव्वाच्या सव्वा देयके आकारल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्राप्त झाली होती. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत पथक गठित केले होते. या पथकाने अमरावती शहरातील ८ खासगी काेविड हाॅस्पिटलची झाडाझडती घेतली. रुग्णांवर आकारण्यात आलेले देयके आणि शासनाने निश्चित केलेले दर या मोठी तफावत या पथकाला आढळून आली. त्यामुळे कोणत्या रुग्णांकडून अतिरिक्त वैद्यकीय देयके वसूल करण्यात आली. याची यादी तार करण्यात आली आहे. आठ खासगी कोविड रुग्णालयांकडून १ कोटी ३० लाख वसूल करून ते रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना परत केले जाणार आहे. विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते रुग्णांना ही रक्कम परत मिळेल, अशी माहिती आहे. येथील पारश्री हॉस्पिटलवर १ लाख तर, आराेग्यमवर ७५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.  

खासगी कोविड हॉस्पिटलच्या कारभारावर प्रश्नचिन्हशहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या खासगी कोविड हॉस्पिटलच्या कारभार पुन्हा प्रश्नचिन्ह उद्भवत आहे. गेल्या काही महिन्यांपासून खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींना महसूल विभागाने अतिरिक्त देयके डॉक्टरांकडून वसूल करण्याची भूमिका घेतल्याने नातेवाईकांच्या तक्रारी सत्य असल्याचे पुढे आले आहे.

खासगी कोविड रुग्णालयात अतिरिक्त देयके घेतल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी नेमली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसांत कारवाईची दिशा निश्चित केली जाईल. संबंधित रुग्णालयाकडून ती रक्कम वसुल केली जाईल. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल