अमरावती : गत सव्वा वर्षापासून कोरोनाचे सावट तसेच वेळोवेळी जिल्ह्यात लागू झालेले लॉकडाऊन त्यामुळे गर्दी टाळण्याकरिता महावितरणसह विद्युत ग्राहकही हायटेक झाले असून, १ लाख ३५ हजार २६७ विद्युत ग्राहकांनी गत मे महिन्यात २२ कोटी ७९ लाख ११ हजार ८७५ रुपयाची विद्युत बिले ही ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा उन्हाळ्याच्या काळात फेब्रुवारीपासून जिल्ह्यात अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे महावितरणनेसुद्धा विद्युत ग्राहकांना चांगली सेवा दिली. थकबाकीधारकांनी वीज कापण्यापूर्वी त्यांना ऑनलाईन पद्धतीने विद्युतचा भरणा करण्यासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन किंवा सूचना करण्यात आल्या. त्यालासुद्धा नागरिकांची चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील चार डिव्हिजनमध्ये २३ सबडिव्हिजन येतात. जिल्ह्यात ३ लाख ८ हजार ८२१ घरगुती विद्युत ग्राहक आहेत, तर २५ हजार ७७० वाणिज्य तर ४ हजार ५९३ औद्योगिक ग्राहक असल्याची माहिती महावितरणने दिली.
बॉक्स विद्युत ग्राहक व थकबाकी
घरगुती
ग्राहक थकबाकी
३ लाख ८ हजार ८२१ ११९ कोटी ५८ लाख ८ हजार
वाणिज्य
२५ हजार ७७० १८ कोटी ९४ लाख ४१ हजार
औद्योगिक
४ हजार ५९३ १२ कोटी ७० लाख