पालकमंत्र्यांची उपस्थित : जिल्हाध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण
अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने सोमवार, २८ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिवस पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थिती व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके, बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सेवादलाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात पालकमंत्री यशोमती ठाकूर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, काँग्रेस एक विचारधारा असून काँग्रेसने देशातील सर्वधर्म, पंथ जातीना एकत्र घेऊन देशहिताला प्राधान्य दिले आहे. पण केंद्रातील मोदी सरकार केवळ उद्योगपतीचे सरकार असून शेतकरी विरोधी धोरण आखत आहे. केंद्रातील भाजप सरकारला शेतकरी व सर्वसामान्य जनतेशी काही देणे-घेणे नाही. जनहितविराेधी या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आल्याचे सांगत भाजपला धडा शिकविण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त केले आहे. कार्यक्रमाला प्रकाश काळबांडे, संजय मार्डीकर, संजय लायदे, भैयासाहेब मेटकर, बिट्टू मंगरोळे, छाया दंडाळे, अमोल ठाकरे, अजिज खान, रामकृष्ण कळसकर, अतुल काळबांडे, समाधान दहातोंडे, विनोद गुडधे, बबलू बोबडे, अजय कडू, बच्चू बोबडे, नंदकुमार मानकर, भागवत खांडे, प्रकाश गोरले, बाळासाहेब मोहोड, जगदीश मनोहरे, मनोज रोही, सुधीर देशमुख, सुजित मेश्राम, नरेंद्र देशमुख, सोहेब खान, विशाल भट्टड, निवृत्ती चतुरभुज, सुभाष वडूरकर, प्रशांत निर्मळ व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.